नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नसल्यचे पोलिसांनी म्हटले आहे.
मेदिनीपूरच्या भूपती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर भागात ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. येथे राहणारे टीएमसी बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी रात्री स्फोट झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह बाहेर काढले. बॉम्ब बनवताना हा स्फोट झाल्याचेही काही माध्यमांनी म्हटले आहे.