नवी दिल्ली : केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुन्नूरच्या पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या बॉम्बस्फोटामुळे इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्यालयातील फर्निचरचेही नुकसान झाल्याचे कार्यालयामधील फोटोंमध्ये दिसत आहे.
Kerala | Visuals from RSS office in Payyannur, Kannur which was allegedly bombed early this morning, leaving the window glass broken pic.twitter.com/ALjpuXNH2K
— ANI (@ANI) July 12, 2022
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यात आला असून हे कृत्य कोणी केले याचा शोध घेतला जात आहे.