बोमन ईराणी सेक्‍सॉलॉजिस्टच्या भेटीला

बोमन ईराणी आणि दिग्दर्शक मिखिल मुसाले हे अलीकडेच एका प्रख्यात सेक्‍सॉलॉजिस्टना भेटायला गेले होते. थांबा… ते स्वतःच्या समस्या घेऊन गेलेले नव्हते… तर चित्रपटातील व्यक्‍तिरेखेची गरज म्हणून गेले होते.

दिनेश विजान यांच्या वेंचर फिल्मतर्फे प्रदर्शित होणाऱ्या “मेड इन चायना’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आणि आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या तीन गाण्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात अहमदाबादमधील एका छोट्या व्यापाऱ्याची कथा मांडण्यात आली आहे. त्याच्या कधीही न हारण्याच्या भूमिकेवर कथानक बेतलेले आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत असून तो रघु मेहता नामक व्यक्‍तिरेखा साकारत आहे. तर या रघुचा पार्टनर असणारा डॉ. वर्धा हा सेक्‍सॉलॉजिस्ट असून ही व्यक्‍तिरेखा बोमन इराणी साकारत आहेत. चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिणाऱ्या मिखिल यांनी या विषयावर बरेच संशोधन केले आहे.

तो सांगतो की, सेक्‍स हा विषय आहे ज्याच्याविषयी लोकांमध्ये बरेच संभ्रम, शंका-कुशंका आहेत. त्याबाबतचे अनेक प्रश्‍न थेटपणाने आम्ही चित्रपटात घेतले आहेत. त्यांची उत्तर अचूकपणाने दिली जावीत यासाठी आम्ही सेक्‍सॉलॉजिस्टना भेटायला गेलो होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.