वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यास येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत असून त्यासाठी यजमान न्युझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. संघात दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झालेल्या वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पुनरागमन केले असून फिरकी गोलंदाज मिचेल सॅन्टनर याला डच्चू देण्यात आला आहे.
या मालिकेत दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिला सामना येत्या शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे तर दुसरा सामना 29 फेब्रुवारीपासून ऑकलंड येथे होणार आहे. दरम्यान, भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत 21 कसोटी मालिका झाल्या आहेत. यापैकी 11 मालिका भारताने जिंकल्या आहेत तर पाच मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
भारताचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), मयांक आग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा.
न्यूझीलंडचा कसोटी संघ – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग.
न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
पहिला सामना – 21 ते 25 फेब्रुवारी – वेलिंग्टन
दुसरा सामना – 29 फेब्रुवारी ते 4 मार्च – ख्राइस्टचर्च (दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे 4.00 वाजता सुरू होतील)
जोहरी यांचा राजीनामा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अर्थात, मंडळाने अद्याप हा राजीनामा मंजूर केलेला नाही. क्रिकेट प्रशासक समितीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरच जोहरी यांनी राजीनामा देणार असे संकेत मिळाले होते. शशांक मनोहर हे मंडळाचे अध्यक्ष असताना 2016 साली जोहरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.