kutimb

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण ;स्वतः ट्विट करत दिली माहिती

मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, मागच्या मदोन चार दिवसात रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाचा विळख्यात अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील अडकले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या शरीरात करोनाची सौम्य लक्षण आहेत. सध्या क्वारंटिनमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. अशा आशयाचे
ट्विट करुन रणवीरनं करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राज्यात कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्रदेशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरले आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना रुग्णसंख्येसह राज्याने केरळला मागे सोडले आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हदार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत.

सोमवारी देशात 9 हजार 93 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळं स्टाफ कमी असल्याने चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात 82 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 च्या पार गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.