मुंबई – एकीकडे देशभरात साऊथच्या चित्रपटांचा दबदबा वाढत आहे. तर, दुसरीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. सिनेसृष्टीतील दोन कलाकारांमध्ये हा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी साऊथ अभिनेता ‘किच्चा सुदीप’ने ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं वक्तव्य करत आपलं मत मांडलं होत.
दरम्यान, आता त्याच्या या विधानावर बॉलिवूडचा सिंघम चांगलाच भडकला असून, या दोन अभिनेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु झाले आहे. सुद्धा सुदीपच्या या व्यक्तव्यावर अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये अजय म्हणतो की… “सुदीप माझ्या भावा, तुझ्या अनुसार जर हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर तर तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीमध्ये डब का केले जातात? हिंदी आमची राष्ट्रीय भाषा होती आहे आणि कायम राहील. जन गण मन.’ असं अजय म्हणाला आहे.
Hello @ajaydevgn sir.. the context to why i said tat line is entirely different to the way I guess it has reached you. Probably wil emphasis on why the statement was made when I see you in person. It wasn’t to hurt,Provoke or to start any debate. Why would I sir 😁 https://t.co/w1jIugFid6
— Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) April 27, 2022
तर अजयच्या या ट्विटला किच्चा सुदीपने देखील उत्तर दिल आहे. ‘सर, मला वाटतं की माझा मुद्दा खूप वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. कदाचित मी माझा मुद्दा तुमच्यासमोर ठेवू शकेन. मी तुम्हाला भेटेन तेव्हा मी तो जरूर मांडेन. माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा किंवा वाद घालण्याचा नव्हता. मी असं का करेन?’ अश्या भावना सुदीपने व्यक्त केल्या आहेत.
.@KicchaSudeep मेरे भाई,
आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं?
हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी।
जन गण मन ।— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
काय होते किच्चा सुदीपचे ‘ते’ पहिले ट्विट
And sir @ajaydevgn ,,
I did understand the txt you sent in hindi. Tats only coz we all have respected,loved and learnt hindi.
No offense sir,,,but was wondering what’d the situation be if my response was typed in kannada.!!
Don’t we too belong to India sir.
🥂— Kichcha Sudeepa (@KicchaSudeep) April 27, 2022
“पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यावर एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, पण असे असूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत. ‘ असं तो म्हणाला.