Entertainment । साली पठाण, जवान आणि डंकी सारखे उत्कृष्ट चित्रपट देणारा सुपरस्टार शाहरुख खान लवकरच ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र शाहरुखच्या मोठ्या चुकीमुळे चित्रपटाच्या स्क्रिप्टची झलक समोर आली आहे.
अलीकडेच, शाहरुख खानने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रतिष्ठित पॅरे अँजेनिक्स एक्सेल लेन्स पुरस्कार जिंकल्याबद्दल सिनेमॅटोग्राफर संतोष शिवम यांचे अभिनंदन केले होते. शाहरुख अभिनंदन करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये किंग या चित्रपटाची स्क्रिप्ट टेबलावर ठेवलेली दिसत आहे.
व्हिडिओ समोर येताच स्क्रिप्टचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या व्हेरिफाईड फॅन पेजवरून स्क्रिप्टची फोटोही शेअर करण्यात आली आहे. पोस्टसोबत लिहिले आहे की, बहुप्रतिक्षित चित्रपटाची अनौपचारिक घोषणा खुद्द किंग खानने केली आहे. दुसऱ्या ब्लॉकबस्टरसाठी सज्ज व्हा.
गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाशी संबंधित अपडेट्स समोर येत आहेत. याआधी बातम्या आल्या होत्या की शाहरुख या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे, तर त्याची लेक सुहाना या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असणार आहे. मात्र, आता निर्मात्यांनी शाहरुखला चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत ठेवले आहे. मात्र, या चित्रपटात तो अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुहाना खानने गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आता लवकरच सुहाना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाची टीम जूनच्या सुरुवातीला लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.