स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत असतात ते ट्विट करत राजकीय सामाजिक मुद्यावरून आपलं मत सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातच करोना लसीवरुन त्यांनी पुन्हा एकदा आपलं मत मांडत ट्विट केले आहे . सध्या त्यांचे हे ट्विट सोशलवर चांगलेच व्हायरल झाले आहे.
I have decided to take #BabaRamdev’s Corona virus #vaccine which will cost me only ₹22 instead of #AdarPoonawala’s Vaccine which will cost me ₹1000. Because both Vaccines are same to same. 🤪😂😁
— KRK (@kamaalrkhan) January 5, 2021
केआरके ट्विट केले आहे की,‘ अदर पूनावाला यांची करोना लस महागडी असल्यामुळे मी बाबा रामदेव यांची २२ रुपये किंमत लस घेणार आहे. मी हा निर्णय यासाठी घेतला आहे कारण दोन्ही लस सारख्याच आहेत. ’ असं म्हणत त्यांनी रामदेव बाबा यांनी तयार केलेल्या लसी घेणार असल्याचं सांगितलं आहे मात्र या लसीच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा ते ट्रोलर्स निशाण्यावर आले आहे.
दरम्यान, मायानगरीत सेलेब्स कमाल आर खानच्या ट्विटकडे लक्ष देत नसले तर सोशल मीडियावरील ट्रोलर्स त्याच्या ट्विटला रिट्विट करत त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.