बॉलीवूडच्या ‘भाईजान’ची अहमदाबादमध्ये ‘गांधीगिरी’; सलमान खानने दिली साबरमतीआश्रमाला भेट

मुंबई – बॉलीवूड दबंग हिरो सलमान खानचा “अंतिम’  नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने सध्या चित्रपटगृह हाऊसफुल्ल केली आहे. काही ठिकाणी तर फॅन्सने चित्रपटगृहात फटाके वाजवत आनंद व्यक्त केला आहे. तर काही  फॅन्स ढोल ताशे वाजवत अंतिम बघायला निघालेले आहेत.

यातच सलमान सुद्धा  चिपटाचा प्रोमोशनसाठी अहमदाबाद दौरा आहे. या दौऱ्यावेळी सलमान  साबरमती नदीच्या काठावरील ‘साबरमती’ आश्रमात थांबला होता. महात्मा गांधीजींचे निवासस्थान असलेले ‘हृदय कुंज’लाही त्याने यावेळी भेट दिली.

भेटीदरम्यान, आश्रमाच्या व्हरांड्यात बसून त्याने चरख्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न केला.  आश्रमाने त्यांच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत करताना कापसाचा हार घातला. सलमानने देखील त्यांच्या खास शैलीत तो हार हाताला गुंडाळला. या प्रसंगाचा व्हिडियो सध्या सोशलवर चांगला व्हायरल होत आहे. सलमान खानच्या गांधीगिरीला सोशलवरील युजर्स आणि फॅन्सकडून दाद मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.