गोडसेवादी ‘स्वरां’नी भास्कर ट्रोल

नवी दिल्ली – स्वरा भास्कर आपल्या सिनेमापेक्षा आपल्या वादग्रस्त ट्‌विटमुळेच अधिक चर्चेत असते. आता तिने असेच एक वादग्रस्त ट्‌विट केले आहे. त्यामुळे पब्लिकने तिची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. तिचे ट्‌विट आणि त्यावर नेटिझन्सनी केलेल्या कॉमेंट बघितल्या की असे वाटते की लोक स्वराच्या एखाद्या वादग्रस्त ट्‌विटची वाटच बघत बसले होते की काय.

दरम्यान, स्वराने आता केलेले ट्‌विट महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी संदर्भातले आहे. स्वराने ट्विट केले आहे की,’ज्या विचारधारेने महात्मा गांधी यांची हत्या केली ती विचारधारा आजही देशात कायम आहे. चला तर मग  महात्मा गांधीयांच्या पदचिन्हांचे पालन करू या.’ असं म्हणत तिने देशातील लोकांना महात्मा गांधींच्या विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. मात्र या ट्विटमुळे स्वरा भास्कर चांगली ट्रोल होत आहे, कारण या ट्विटमध्ये स्वरा भास्करने अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. तर ट्विटरवर एका युजर्सने  ‘गोडसे जिंदाबाद’ म्हणत तिचा ट्विटला प्रतिक्रिया आहे. सध्या सोशल मीडियावर स्वरांच्या ट्विटमुळे युजर्समध्ये चांगलच शाब्दिक चकमक बघावयास मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.