मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा भलेही विदेशात असो ती आपल्या गोष्टीची अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतंच प्रियांकाने आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केलेत ज्यानुसार तिने फॅमिली सुट्ट्या एन्जॉय केल्याचे समजते. निक जोनससोबत लग्न झाल्यानंतर प्रियांकाच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये प्रियांका ब्लॅक बिकिनीसह व्हाईट सिल्की जॅकेट घातलेली दिसते. ‘सानिडेज’ असे प्रियंकाने आपल्या फोटोला कॅप्शन दिले आहे. यावेळी ती एका स्विमिंग पुलच्या बाजूला उभी असल्याचे समजते. डोक्यावर घातलेली हॅट आणि दिलेली हॉट पोज यामुळे प्रेक्षकांना हे फोटो चांगलेच आवडल्याचे कमेंटवरून समजते.
बिकिनीमधील फोटो शेअर करण्यापूर्वी प्रयांकाने तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबतचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये प्रियांका पूलच्या बाजूला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान तिने आपल्या मुलीला पकडून पोज दिली आहे. फोटोमध्ये प्रियांकाने मुलीचा चेहरा पांढऱ्या हार्टच्या इमोजीने झाकला आहे. यावर काही चाहत्यांनी मुलीला नजर लागू नये म्हणून प्रियांकाने असे केल्याच्या कमेंट केल्या आहेत.
प्रियांकाने 18 जुलै रोजी तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. तिने आपला खास दिवस तिच्या कुटुंबासह आणि काही खास मित्रांसोबत साजरा केला. प्रियांकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला निक जोनस, परिणीती चोप्रा, मधु चोप्रा, मालती मेरी आदींनी हजेरी लावल्याचे दिसून आले होते.