Bollywood News | अभिनेत्री राधिका मदानने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही शोमधून केली होती. ‘मेरी आशिकी तुम’ या टीव्ही शोमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. टीव्हीनंतर राधिकाने ‘पटाखा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आता तिने घराणेशाहीवर मौन सोडले आहे. राधिकाने एका मुलाखतीत सांगितले की, बाहेरील लोकांपेक्षा फिल्मी जगतातील लोकांना काम मिळणे सोपे आहे.’
राधिका मदान म्हणाली,’बॉलिवूडमध्ये इतर इंडस्ट्रीप्रमाणेच घराणेशाही आहे. स्टार किड्सना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची भरपूर संधी मिळते, परंतु बाहेरच्या लोकांसोबत असे होत नाही. स्टार किड्सला २-३ चित्रपट करून शिकायला मिळते, ते सुरुवातीला शिकतात, सुधारणा करतात, तिसऱ्या चित्रपटात खूप छान अभिनय करतात आहे. तर याचाच उलट इतरांना तू अभिनय करू शकत नाहीस, आम्ही तुला संधी दिली, आता तू बाहेर निघ. असे होत असते. राधिका पुढे म्हणाली की, बाहेरच्या लोकांना जास्त संधी मिळत नाहीत. माझी एक चूक झाली तर मला काढून टाकले जाईल, मला अभिनय शिकण्यासाठी २-३ चित्रपट करण्याची संधी मिळणार नाही. हा फरक असतो.’
राधिकाने पटाखा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये दिसली होती. याशिवाय राधिका मोनिका ओ माय डार्लिंग, डॉग, सास बहू और फ्लेमिंगो आणि सरफिरामध्ये दिसली आहे. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर एका मुलाखतीत राधिकाने नेपोटिझमबद्दल बोलले होते.