मुंबई- सध्या सगळीकडेच तणावाचं वातावरण आहे. त्यात अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या काळात संयम बाळगणं प्रचंड गरजेचं असताना अनेकलोक आपला संयम विसरत आहेत. खरंतर या काळात विरंगुळा म्हणून आपण अनेक विचारवंतांचे व्हीडियो बघत असतो. मात्र बॉलीवूडमध्येही अशाच विषयांवर आधारित काही चित्रपट आहेत.
आपण जे पाहतो. त्याने आपल्या आयुष्यावर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे जर आपण आयुष्याला वळण देणारे चित्रपट पहिले तर आपलं काम सोपं होईल. अनेक बायोग्राफिचे चित्रपट आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरतात.
थोडंजरी अपयश आलं तर आपण लगेचच हार मानतो. मात्र ते न करता ही काही मोजक्या चित्रपटांची मालिका नक्की बघा. आयुष्यात नव्या उमेदीने काम करण्यास नक्की चालना मिळेल.
लाईफ ऑफ पाय – हा ऑस्करविजेता चित्रपट आहे. एक किशोरवयीन मुलगा समुद्राच्या मधोमध एका नावेमध्ये अडकतो. मात्र त्याच्यासोबत त्या नावेत एक वाघदेखील असतो. त्यानंतर तो त्या परिस्थीतीवर कशी मात करतो. हे नक्की बघा.
मांझी माउंटेन मॅन: हा चित्रपटदेखील एखाद्या निराशावादी माणसाला नवी जिद्द देणारा आहे. आयुष्यातील अनेक वर्ष खर्ची करून एक मनुष्य डोंगरांमधून रस्ता तयार करतो असे या चित्रपटाचे कथानक आहे.
इंग्लिश विंग्लिश — तुम्ही कुणावरतरी कशासाठी तरी अवलंबून असता आणि तुम्हाला ते पदोपदी अपमानास्पद वाटत असेल तर तुम्ही इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट नक्की पहा.
एलिझाबेत एकादशी- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की कामी येतो. आपली एक गोष्ट वाचवण्यासाठी आपण किती मेहनत केली पाहिजे हे या चित्रपटात उत्तम रेखाटले आहे.