मुंबई – बॉलिवूड सेलेब्स फक्त चित्रपट आणि जाहिरातींमधून पैसे कमावत नाहीत तर त्यांच्या कमाईचा मोठा सोर्स हा इंस्टाग्राम पोस्ट आहे. याबाबत अनेकांना माहिती नसेल. बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत जे आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून कोटींची कमाई करतात. कोणत्या स्टारची किती कमाई आहे याबाबत आज माहिती घेणार आहोत.
बिग बी अमिताभ
बिग बी अमिताभ सोशलवर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ते 40 ते 50 लाख रुपये चार्जेस घेतात. अमिताभ बच्चन ट्विटरवर जास्त सक्रिय असतात.
View this post on Instagram
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान काही काळापासून सिनेमापासून दूर असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानही सोशलवर सक्रिय असतो. शाहरुख खान एका पोस्टसाठी 80 लाख ते 1 कोटी चार्जेस घेतो.
प्रियंका चोपडा
इंस्टाग्रामवर प्रियंकाचे 47 मिलियन्सहून अधिक फॉलोवर्स आहेत. एका पेड पोस्टसाठी ती 1.87 कोटी रुपये घेते.
आलिया भट
आलिया भट केवळ इंस्टाग्रामवरूनच नाही तर युट्युबवरूनही कमाई करते. तिनं स्वत:चं चॅनल सुरू केलं आहे. एका पोस्टसाठी आलिया 1 कोटी घेते.
सारा अली खान
सारा अली खान नेहमीची इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग असते. ती एका पोस्टसाठी आलिया 50 लाख ते 60 लाख रुपये चार्जेस घेते.
शाहिद कपूर
कबीर सिंह सिनेमानंतर शाहिद कपूरचे चाहते वाढले आहेत. त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली आहे. शाहिद एका पेड पोस्टसाठी 20 ते 30 लाख रुपये चार्जेस घेतो.
View this post on Instagram