‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी बॉलीवूड सेलेब्स सरसावले

नवी दिल्ली – करोना पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने अनेकांवर वाईट वेळ आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अश्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या  जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील मालविया नगरमधील कांता प्रसाद आणि बादामी देवी यांचा आहे. दिल्लीतील या 80 वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीसह ‘बाबा का ढाबा’ सुरू केला आहे.

मात्र  लॉकडाऊनमुळे या आजोबांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. या आजोबांच्या  एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून  शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबा भावुक झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. क्रिकेटर आर अश्विन असं अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत या आजोबांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर सध्या बाबा का ढाबा हे ट्रेंड होत असून, अनेकांनी या दाम्पत्याच्या मदतीसाठी तपशील मागितले आहेत.

हा व्हिडीओ सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रविनाप्रमाणेच सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील बाबा का ढाबाच्या मदतीसाठी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.