शेतकऱ्यांच्या आक्रोशाला बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा!

नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून आहेत. देशातील सामान्यांपासून ते  सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पंजाबी कलाकार असो वा बॉलिवूड कलाकार सर्वच जण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता, दिलजीत दोसांज, सनी देओल, प्रियांका चोप्रा, प्रति झिंटा, या सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आंदोलनावर भाष्य केलं आहे.

‘आज जर तुम्ही काही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे’, असं रितेश देशमुख ट्विटरवर म्हणाला आहे.

‘जेव्हा शेती सुरू होते तेव्हा इतर कला अनुसरल्या जातात. त्यामुळे शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत’, असं सोनम कपूर म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांनी देखील ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. ‘मी शेतकरी आणि केंद्र सरकारसोबत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आपले शेतकरी हे भारताचे फूड सोल्जर्स आहेत. त्यांची भीती दूर करणं आवश्यक आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. लोकशाही देश म्हणून हे संकट लवकरात लवकर दूर होईल याची काळजी घेणं आवश्यक आहे”. प्रियांका चोप्राचं हे ट्विट दिलजीतने रिट्विट केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.