पाकिस्तानातील लैंगिक गुन्हेगारी बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमुळेच

नवी दिल्ली – भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून तणावपूर्ण आहे. याचमुळे काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने भारतीय सिनेमांवर बंदीही घातली आहे. तर भारतानेही तोडीस तोड उत्तर देत पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यावर बंदी घातली, असे असले तरी  पाकिस्थानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतावर बेझूट आरोप केले आहे. इमरान खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान वाढती लैंगिक गुन्हेगारीचे कारण बॉलिवूड आणि हॉलिवूडवर फोडलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, ‘पाकिस्तानात मोबाइल फोनमुळे एक मोठं संकट येत आहे. मोबाइलमध्ये मुलांना आतापर्यंत न मिळालेला मजकूर मिळत आहे. शाळेमध्ये मुलांना अमली पदार्थ मिळत आहेत. सुरुवातीला मला या गोष्टीबद्दल माहीत नव्हतं. पण सत्तेत आल्यानंतर या सर्व गोष्टी कळू लागल्या. दुसरी गोष्ट म्हणजे वाढती लैंगिक गुन्हेगारी. यातही बाल लैंगिक अत्याचार वाढत आहेत. ही अत्यंत वाईट स्थिती आहे.’ दरम्यान, इमरान खान यांच्या या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here