बॉलीवूडचीही एक सुंदर बाजू आहे – अदिती राव हैदरी

अभिनेत्री अदिती राव हैदरीला वाटते की बॉलीवूडचीही सुंदर बाजू आहे. ती म्हणते की, ही सर्वसमावेशक जागा आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये “इनसाइडर्स-आऊटसाइडर्स’च्या वादावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

या विषयावर बॉलीवूड आणि सोशल मीडियावर पसरलेल्या वातावरणात स्वतःला कसे सकारात्मक ठेवत आहे याविषयी अदिती म्हणाली, “मला खात्री आहे की एक दिवस हा वाद संपुष्टात येईल. आम्हीही मनुष्य असल्याने आम्हीदेखील चुका करतो. आमच्यातदेखील उणिवा आहेत. परंतु आपल्या उद्योगाला नक्कीच एक सुंदर बाजू देखील आहे.

अदिती म्हणाली, “आम्ही सर्वजण एकत्र आहोत. निष्ठावंत आहोत, आम्ही एकत्र उभे आहोत. लोक काय म्हणत असोत आम्ही एकत्र उभे राहणार. लोक आउटसाइडर-इनसाइडर बद्दल बोलतात. पण मी असे म्हणू शकते की मला काही समस्या असल्यास मी पुष्कळ लोकांना कॉल करू शकते. भलेही मी आउटसाइडर असले, तरी ते माझी मदत करण्यासाठी पुढाकार घेतील. कारण या इंडस्ट्रीत एक सर्वसमावेशक अशी जागा आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अदिती नुकतीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या “वी’ या तेलुगू चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत नानी आणि सुधीर बाबू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडियोवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.