मुंबई – बॉलिवूडला 80 च्या दशकात उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री ‘विद्या सिन्हा’ यांचे आज अल्पशा आजारानं निधन झाले आहे. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुफ्फुसाच्या विकारानं त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
Mumbai: Veteran actor Vidya Sinha passes away in a hospital in Juhu. She had acted in various movies including ‘Chhoti Si Baat’, ‘Rajnigandha’ and ‘Pati Patni aur Woh’. pic.twitter.com/WDMtjbMtqj
— ANI (@ANI) August 15, 2019
‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’, ‘तुम्हारे लिए’, ‘सफेद झूठ’, ‘मुक्ती’ ‘सबूत’ अशा गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या विद्या सिन्हा यांची चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच, विद्या यांनी सिनेमांव्यतिरिक्त ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.