Bollywood Actress । Adopted children : अनेक भारतीय अभिनेत्रींनी मूल दत्तक घेण्याचा पर्याय स्वीकारला असून त्याद्वारे त्यांनी अनेकांना उदाहरण घालून दिलेले आहे. एकेकाळी दत्तक घेणे म्हणजे चुकीचे किंवा अपराधीपणाचे मानले जात असे. आता मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मूल दत्तक घेण्याचा पर्याय सर्वमान्य झाल्याचे दिसून ये.
ते अर्थात त्यामागे समाजातील अनेक घटकांचे प्रयत्न आहेत. त्यात हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींचा देखील सहभाग आहे. पालकत्वासाठी मुल दत्तक घेणे हा एक चांगला पर्याय असल्याचे त्यांनी लोकांना उदाहरणातून दाखवून दिलेले आहे.
मूल दत्तक घेणाऱ्या अशा अभिनेत्रींविषयी…
१) सनी लियोनी – या अभिनेत्रीने पत्ती डॅनियल वेबर सोबत जुलै 2017 मध्ये 21 महिन्यांच्या निशानामक मुलीला दत्तक घेतलेले आहे या सर्व प्रक्रियेनंतर तिने अतिशय आनंद व्यक्त केला होता आणि आपल्याला आयुष्यात मिळालेली सर्वात अनमोल गिफ्ट म्हणजे निशा असल्याचे सांगितले होते. सनी लियोनी आणि डॅनियल वेबर यांना नंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे दोन मुलगे देखील झालेले आहेत. आशर आणि नोह अशी त्यांची नावे आहेत.
२) सुश्मिता सेन – या अभिनेत्रीने घेण्याचा पर्याय निवडल्यानंतर त्याची बातमी झाली होती 2000 साली वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिने रेनी नावाच्या मुलीला दत्तक घेतले. दहा वर्षानंतर तिने आणखी एका मुलीला दत्तक घेऊन तिचे नाव अलिसाह असे ठेवले.
रेनीला दत्तक घेऊन घरी आणण्यापूर्वी तिला अनेक कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागले. आता रेनी आणि अलिसाह दोघी देखील सेलिब्रेटीच्या मुली म्हणून वावरत असतात. त्या दोघींचा आईशी असलेली जवळीक आणि प्रेम हे त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मधून दिसून येते.
३) प्रीती झिंटा – प्रीती झिंटाने ऋषिकेश येतील मदर मिरॅकल स्कूल मधून 34 निराधार मुलींचे पालकत्व स्वीकारलेले आहे. त्यांचे शिक्षण, त्यांचे जेवणखाण, कपडे या सगळ्यांचा खर्च तिने उचललेला आहे. याबाबतची माहिती तिने एका मुलाखतीत दिलेली होती. ती म्हणते, की ही मुले आता माझी आहेत आणि त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे.
४) रविना टंडन – खूपच कमी लोकांना माहित आहे की सुश्मिताच्या आधी रविना टंडनने मुल दत्तक घेण्याचा पर्याय स्वीकारला होता. 1995 मध्ये रवीना 21 वर्षांची असताना तिने छाया आणि पूजा अशा दोन मुली दत्तक घेतल्या.
अनिल थडानी यांच्याशी लग्न करण्याच्या आधी खूप वर्षे तिने या मुलींना दत्तक घेतलेले आहे. आता या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. लग्नानंतर रवीनाला अनिल थडानी यांच्यापासून मुलगा रणबीर आणि मुलगी राशा अशी दोन अपत्ये झालेली आहेत.
५) शोभना – मल्याळम चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीने सहा महिन्यांच्या अनंता नारायणी या मुलीला दत्तक घेतले आहे. तिच्या अन्नग्रहण कार्यक्रमासाठी ती गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात आली होती. केरळ मध्ये जेव्हा मूल घनपदार्थ खाऊ लागते, तेव्हा त्या मुलाचा अन्नग्रहण कार्यक्रम केला जातो.
६) नीलम कोठारी – नीलम कोठारी हिने 2011 मध्ये समीर सोनी याच्याशी लग्न केले आणि नंतर त्यांनी आहाना नावाच्या मुलीला दत्तक घेतले. त्या दोघांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की आपल्याला जैविकदृष्ट्या किंवा दत्तक मार्गाने मुलगीच हवी आहे. समीरच्या कुटुंबात साधारणपणे मुलगे जन्मले आहेत त्यामुळे त्यांनी मुलीला दत्तक घेण्याचे ठरवले.