फुटवेअर प्रेमी कृती

बॉलीवूड अभिनेत्री कृती खरबंदाने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर सिनेसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये आपले एक स्थान तयार केले आहे. सध्या ती “पागलपंती’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. यासाठी वेगवेगळ्या शोजमधून ती हजेरी लावत आहे. नुकतीच ती कपिल शर्माच्या “द कपिल शर्मा शो’मध्ये आली होती. त्यावेळी तिने आपल्या वैयक्‍तिक आयुष्यातील काही आठवणी, किस्से, जीवनशैली यांविषयीची माहिती शेअर केली.

यावेळी बोलताना कृतीने आपल्याला वेगवेगळ्या पादत्राणांची अत्यंत आवड असल्याचे सांगितले. तसे पाहता सर्वांनाच ही आवड असते. कारण अलीकडील काळात फुटवेअर हादेखील व्यक्‍तिमत्त्वाचा आणि स्टेटसचा विषय झाला आहे. आजच्या कॉलेजगाईंग तरुण-तरुणींबरोबरच आयटीतील नोकरदारांकडे मॅचिंग फुटवेअर्स असतात. पण मंडळी कृतीबाईंजवळ 100 हून अधिक चप्पलांचे, सॅंडल्सचे कलेक्‍शन आहे.

विशेष म्हणजे, ती कधीही एक फुटवेअर रिपिट करत नाही. म्हणजे एकदा वापरलेले चप्पल-सॅंडल पुन्हा वापरत नाही. आता बोला…! या नायिकांच्या आवडी-निवडी यांविषयी जाणून घ्यायला आपल्याला आवडतंच हो, पण हे असले छंद जोपासायचे म्हणजे खिसाही तितकाच ताकदवान हवा !

Leave A Reply

Your email address will not be published.