बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिचे सध्या एकापाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र जान्हवीला अजूनपर्यंत बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आलेली नाही. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसते.
जान्हवीला करण्यात आले ट्रोल
जान्हवी कपूर ही ‘देवरा पार्ट 1’ चित्रपटामध्ये ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत धमाल करताना दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी हळूहळू रिलीज होताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेल्या गाण्यामध्ये जान्हवी कपूर ही ज्यूनिअर एनटीआर याच्यासोबत रोमांन्स करताना दिसत आहे. हेच लोकांना आवडले नाही., जान्हवी कपूर ही ज्यूनिअर एनटीआर याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. यामुळे ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूरचा रोमांन्स लोकांना अजिबातच आवडला नाही.
ज्यूनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची जोडी देवरा पार्ट 1 मध्ये काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे ज्यूनिअर एनटीआरसोबत काम करण्याचे आपले स्वप्न असल्याचे काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिने म्हटले होते. शेवटी जान्हवी कपूर हिचे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे.