मुंबई – बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक असलेल्या अलाया एफने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे` मालदीच्या बीचवर अलायाने बिकिनी घालून योगा केला, त्यानंतर तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
अलाया एफने सैफ अली खान आणि तब्बू स्टारर ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील अलायाच्या अभिनयाची सर्वानीच खूप प्रशंसा केली. त्यानंतर अलाया बरेच दिवस चित्रपटांमध्ये दिसली नाही परंतु ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते त्यामुळे तिच्या नावाची सिनेसृष्टीत नेहमी चर्चा होते.
अलायने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती बिकिनी घालून बीचवर योगा करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही बघू शकता की, मला माझ्या वैयक्तिक सुरक्षेबद्दल फार कमी आदर आहे. याशिवाय अलायाने काही फोटोही शेअर केले आहेत, ही छायाचित्रे शेअर करताना अलाया फर्निचरवालाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मि जादुई फील करत आहे आणि मालदीवच्या सूर्यप्रकाशाचा आनंद लुटत आहे.
View this post on Instagram
नेटकाऱ्यानी अलायाच्या व्हिडिओवर जोरदार कमेंटबाजी केली आहे. कोणी पावसाळ्यात तापमान वाढवल्याचे म्हंटले आहे तर कोणी मासोळी लूक आवडला असल्याच्या कमेंट केल्या आहेत. अलाया आगामी २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘यु टर्न’चित्रपटाच्या रिमेकमध्ये अलाया कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे तर दुसऱ्या चित्रपटासाठी अलाया अर्जुन कपूरसोबत स्क्रिन शेअर करेल.