बॉलिवूड अभिनेते ‘जितेंद्र’ मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत

नवी दिल्ली– २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ‘नरेंद्र मोदी’ आज सायंकाळी ७च्या सुमारास पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ‘जितेंद्र’ देखील राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.

आज, शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×