मुंबई – ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीकडून आज 6 तास कसून चौकशी करण्यात आली. अर्जुन आज सकाळी साडेअकरा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आला होता. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत चौकशी करण्यात आली. दरम्यान, दिल्लीतील एका डॉक्टराचा जबाब नोंदविण्यात आलेला असल्याने त्याच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या आत्महत्यानंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आहे. ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीकडून आज दुस-यांचा चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी एनसीबीकडून आतापर्यत बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे.
दरम्यान, एनडीपीएस कायद्यांतर्गत अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत त्याच्या घरातून काही औषध ताब्यात घेण्यात आले. एनडीपीएस कायद्यानुसार या औषधांसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते.