‘मलायका’सोबत लग्नाच्या चर्चाबद्दल ‘अर्जुन कपूर’ म्हणाला…

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाची तारीख, ठिकाण निश्चित झाल्याच्या बातम्या सुध्दा आल्या आहेत. पहिल्यांदा अर्जुन-मलायका 19 एप्रिलला लग्न करणार अशी बातमी आली होती मात्र तसं झालं नाही. त्यानंतर आता ते जून महिन्यात लग्न करणार अशा अफवा आहेत. त्यानंतर अर्जुन कपूरने माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना अर्जुन कपूरने मलायका आणि त्याच्याबाबत लग्नाच्या असलेल्या चर्चा या अफवा असल्याचं सांगत सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. लग्न केलं तर सर्वांना नक्की सांगेन, असं त्याने यावेळी सांगितल आहे.

लग्नाविषयीच्या चर्चांवर बोलताना अर्जुन म्हणाला की, ‘सध्यातरी मी लग्न करत नाहीये. मी जेव्हा लग्न करेन तेव्हा याबाबत सर्वांना सांगेन. ही गोष्ट लपवण्यासाठी माझ्याकडे काही विशेष कारण नाही. इतरापासून लपवावं असं यामध्ये काहीच नाही. मी माझ्याबदल इतर काही लपवत नाही, तर लग्नाची गोष्ट का लपवेन’?

‘सध्या मी माझ्या कामात अत्यंत व्यस्त असल्याने सध्यातरी लग्न करण्याचा विचार नाही. लोक काय म्हणतात, मला याची पर्वा नाही. तसंच वेळेपूर्वी कोणतंही काम करणं मुर्खपणा असतो’, असंही यावेळी अर्जुन कपूरने सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी मे २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. एकीकडे अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.