Bollywood actor Akshay Kumar । बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्षय कुमार कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. आजच अक्षयचा सरफिरा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या दोन दिवसांपासून अक्षय कुमारची तब्येत ठीक नव्हती. सरफिराच्या प्रमोशनमध्ये तो सतत व्यस्त होता. तब्येत बरी नसल्यामुळे त्याच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या.अशात तो करोना पॉझिटिव्ह आढळला. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर त्याने स्वतःला वेगळे केले आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे तो लक्ष देत आहे आणि खबरदारी घेत आहे.
आज अक्षयचा सरफिरा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सरफिरा हा एक बायोपिक आहे, जो जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातील घटना दाखवतो. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अक्षय खूपच उत्सुक दिसत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त राधिका मर्चंट देखील मुख्य भूमिकेत आहे. सरफिरामध्ये सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अक्षयच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना त्रास झाला आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. अशी अपेक्षा आहे की बॉलीवूडचा खिलाडी कुमार लवकरच कोविडमधून बरा होईल अशी प्रार्थना चाहत्यांकडून केली जात आहे. मात्र, अद्याप अक्षयने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
===============