आयुष्यमान खुरानाची शहीद जवानांवर भावूक कविता

पुणे – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर अनेकांनी या घटनेनंतर निषेध व्यक्त केला.

अजूनही विविध क्षेत्रातून अनेक स्वरूपात प्रतिक्रिया येत आहेत. बाॅलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने शहिद जवानांवर एक भावूक कविता लिहिली आहे. त्याने ही कविता ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

आयुष्यमानची कविता –

देश का हर जवान बहुत ख़ास है,
है लड़ता जब तक श्वास है,
परिवारों के सुखों का कारावास है,
शहीदों की माओं का अनंत उपवास है,
उनके बच्चों को कहते सुना है –
पापा अभी भी हमारे पास हैं!

-आयुष्मान

यापूर्वी अनेक बाॅलीवूड अभिनेत्यांनी ही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक इंग्रजी कविता सादर केली होती. तर मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने सुध्दा कविता शेअर केली होती.

#PulwamaAttack : …सरणावरची आग अजूनही विझली नाही – जितेंद्र जोशी

Leave A Reply

Your email address will not be published.