सॅंटियागो – बोलिव्हियाच्या निवडणुकीत फेरफार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हिंसाचार सुरूच असून असून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 700हून अधिक नागरिकत जखमी झाले आहेत. कोचाबांबामध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्षात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाचे प्रमुख मिशेल बाशेलेट यांनी चिंता व्यक्त केली आहे.
देशातील विरोधी पक्षांनी निवडणुकीत प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत निकाल मान्य करण्यास नकार दिला होता. ऑर्गनायझेशनन ऑफ अमेरिकन स्टेट्सनुसार निवडणुकीत मोठे गैरव्यवहार झाले आहेत.
या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने अध्यक्ष इवो मोरालेस यांनी राजीनामा देत मेक्सिकोत आश्रय घेतला आहे. या घडामोडीनंतर स्वतःला अंतरिम अध्यक्ष घोषित करणाऱ्या जीनित अनेज यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांवर सुरक्षा दलांनी अश्रूधूराचा वापर करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बोलिव्हियातील हिंसक निदर्शनांदरम्यान मोरालेस आणि उपाध्यक्ष अलवारो गार्सिया लिनेरा यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोघांनीही मेक्सिकोत आश्रय घेतला आहे. अध्यक्षीय निवडणुकीत मोरालेस हे दुसऱ्यांदा विजयी ठरले होते. या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून देशात निदर्शने सुरू आहेत.