मदनवाडीजवळ अपघातात बोलेरो- एसटीची धडक

इंदापूरचे माजी सभापती गंभीर जखमी

भिगवण- बारामती – भिगवण रोडवरील मदनवाडी घाटातील वळणावर बोलेरो आणि एसटीची धडक होऊन झालेल्या अपघातात इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश वसंतराव जाधव हे गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात बोलेरो गाडी चक्‍काचूर झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी आठच्या सुमारास घडली. पिंपळे येथील कार्यक्रमासाठी जाधव हे भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात होते.

मदनवाडी हद्दीतील वळणावर गाडी व एसटीची जोरदार धडक झाली. जाधव रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जाधव यांच्यावर भिगवण येथील खासगी आयसीयु सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. जाधव यांच्या पायाला आणि डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हर्षवर्धन पाटील यावेळी हजर होते. त्यांनी पुढील उपचारासाठी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून व्यवस्था करण्याचे काम केले.

Leave A Reply

Your email address will not be published.