संजू बाबाच्या पत्नीचे बोल्ड फोटो सोशलवर व्हायरल; फॅन्स म्हणाले…

पुणे – बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता म्हणजेच ‘संजू बाबा’ नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. संजय दत्त प्रमाणेच त्याची पत्नी ‘मान्यता दत्त’ देखील सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

मान्यता नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, तिच्या या फोटोंमध्ये तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सर्वाधिक चर्चेचे असतात. तिचा बोल्ड लूक फॅन्सला प्रचंड आवडतो.

सोशल मीडियावर मान्यता दत्तला 2 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. मान्यता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती. 

नुकतंच मान्यता दत्तने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले असून, यामध्ये ती प्रचंड हॉट आणि मादक दिसत आहे. मान्यता दत्तचा हा मादक अंदाज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फॅन्सकडून तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 

मान्यताचा जन्म मुंबईत झाला मात्र तिने दुबईत आपलं शिक्षण घेतलं. मान्यताने 2008 मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले. मान्यता आणि संजय दत्तला शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत. 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.