बोक्‍साम मुष्टियुद्ध : भारतीय मुष्टियोद्‌ध्यांचे पदक निश्‍चित

नवी दिल्ली – सहा वेळची जागतिक विजेती महिला मुष्टियुद्धपटू एम. सी. मेरी कोम व अव्वल खेळाडू अमित पांघल यांच्यासह भारताच्या एकूण 12 खेळाडूंना बोक्‍साम मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. इतकेच नव्हे तर, आता हे सर्व खेळाडू पदकापासून केवळ एक पाऊल लांब आहेत.

मेरी कोमसह भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच मुष्टियोद्धे या
स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मेरी कोम (51 किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. पांघलला (52 किलो) सलामीच्या लढतीत पुढे चाल मिळाली असून त्याची उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या गॅब्रियल इस्कोबारशी गाठ पडणार आहे.

आशीष कुमार (75 किलो) आणि सुमित संगवान (81 किलो) हे उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी भोगलेले खेळाडूही पुनरागमन करत असून सतीश कुमार (91 किलोवरील) व संजीत (91 किलो) यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये जास्मिन आणि मनीषा (57 किलो) यांच्यासह सिमरनजीत कौर (60 किलो), पूजा राणी (75 किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (69 किलो) यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.