बिहारमध्ये बॉयलरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

 मोतिहारी : बिहार राज्यातील मोतीहारी येथे स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंपाकघरात बॉयलर स्फोट झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाचहून अधिक नागरीक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी सकाळी सुगौली येथे घडली.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही लोक मिड डे मील पुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंपाकघरात सरकारी शाळांमधील मुलांना जेवण देण्यासाठी स्वयंपाक करत असताना ही दुर्घटना घडली.

सुगौली नगर परिषद शाळांकरिता खाद्यपदार्थ बनवले जात होते. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास बॉयलरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे घरावरील पत्रे उडून गेली. यात 3 जणांचा मृत्यू झाला असून अन्य कामगार जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच तिन्ही मृतदेह मोतिहारी सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, अशी माहिती सुगौली पोलीस स्टेशनचे अधिकारी रोहित कुमार यांनी दिली.

स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी लोकांची गर्दी होती. स्थानिक लोकांनी त्वरीत घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह माजी वन व पर्यावरण मंत्री आमदार रामचंद्र साहनी यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)