नवी दिल्ली : बिहारमधील मोतीहारी येथे स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंपाकघरात बॉयलर फुटल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत. शनिवारी सकाळी सुगौली येथे ही घटना घडली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Motihari: Four people have died and more than five have been injured after a boiler exploded in an NGO’s kitchen in Sugauli, early morning today. Injured have been admitted to hospital. #Bihar pic.twitter.com/JC6gsn68MO
— ANI (@ANI) November 16, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक मिड डे मील पुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंपाकघरात सरकारी शाळांमधील मुलांना जेवण देण्यासाठी स्वयंपाक करत असताना ही घटना घडली. सुगौली नगर परिषद शाळांकरिता खाद्यपदार्थ बनवले जात होते. दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास बॉयलरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे घरावरील पत्रे उडून गेली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी लोकांची गर्दी होती. स्थानिक लोकांनी त्वरीत घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह माजी वन व पर्यावरण मंत्री आमदार रामचंद्र साहनी यांनीही घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.