अरुणाचल सीमेजवळ बोफोर्स; चीनच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज

नवी दिल्ली – चीनच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने आपली तयारी वाढवली आहे.लष्कराने अरुणाचल प्रदेशातील एलएसीच्या पुढे असलेल्या भागात बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत.

लष्कराने आपल्या एअर फायर पॉवरमध्ये हेरन आय ड्रोन, सशस्त्र हल्ला हेलिकॉप्टर रुद्र आणि ध्रुव तैनात केले आहेत. या विंगमध्ये चित्ता हेलिकॉप्टर आधीच एव्हिएशन विंगमध्ये मोठ्या प्रमाणावर तैनात होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, लष्कराने एलएसीला लागून असलेल्या भागात स्वदेशी हलके हेलिकॉप्टर ध्रुवचे एक पथकही तैनात केले आहे. एवढेच नव्हे तर रुद्र लढाऊ हेलिकॉप्टरच्या पहिल्या स्क्वॉड्रनने कोणत्याही नापाक कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देखील तयार केले आहे.

पूर्व लडाखमध्येही भारताने एलएसीवरील चीनच्या आगळीकीला सामोरे जाण्यासाठी तैनाती वाढवली आहे. भारतीय लष्कराने के -9 ऑटोमॅटिक होवित्झर रेजिमेंट पूर्व लडाखच्या पुढच्या भागात तैनात केली आहे. ही तोफ सुमारे 50 किमी अंतरावर शत्रूची पोझिशन्स नष्ट करण्यास सक्षम आहे. के-9 वज्र तोफ उच्च उंचीच्या भागातही काम करू शकतात.

दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन आपले सैन्य वाढवण्याचे काम करत आहे. चिनी सैन्याने पूर्व लडाखमधील एलएसीवर 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. तसेच पीएलए भारतीय सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ड्रोन वापरत आहे. चीनी सैन्याचे ड्रोन मुख्यतः दौलत बेग ओल्डी सेक्‍टर, गोगरा हाइट्‌स आणि प्रदेशातील इतर ठिकाणी दिसतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.