शिरुर : टाकळी हाजी येथील सोदक वस्ती येथे शेतामध्ये सासऱ्याला जेवणाचा डब्बा घेऊन गेलेल्या सुप्रिया शहाजी सोदक (वय. ३२ वर्षे) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयत महिलेचे सासरे सुरेश मारूती सोदक यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ : ३० वा. च्या सुमारास सुरेश सोदक हे शेतात शेतीचे काम करत होतो. त्यावेळी त्यांची सुन सुप्रिया शहाजी सोदक ही त्यांना जेवणाचा डबा घेउन शेतात आली व त्यांना फोन करूण म्हणाली तुमचा डबा आणला आहे.
जेवण करूण घ्या असे तिने सांगितले, त्यानंतर सासरे सुरेश सोदक हे २: ३० वा. सुमारास जेवण करण्यासाठी आले त्यावेळी त्यांची सुन सुप्रियाला त्यांनी फोन केला असता तीने फोन उचलला नाही.तेव्हा तीचा आजुबाजुला शेतात शोध घेतला त्यावेळी ती त्यांना शेतातील विहीरीत तरंगतानी दिसली.
त्यावेळी लगेच त्यांनी व त्यांचा शेजारी सुभाष पानसरे यांनी तिला बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय शिरूर येथे आणले. त्यावेळी डॉक्टारांनी तपासुन ती मयत झालेचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास टाकळी हाजी औट पोस्टचे पो. हवा. शरद वारे हे करत आहे.