बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल याने “क्लास ऑफ 83′ चित्रपटातून मोठया पडद्यावर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, बॉबी देओल एका कडक आणि इमानदार पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे.
“क्लास ऑफ 83′ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भ्रष्ट्राचारी लोकांविरोधात बॉबी देओल आपले मिशन पूर्ण करण्यासाठी पाच जणांची टीम तयार करतो. ऍक्शन आणि थ्रिलरने भरलेला या चित्रपटात मुंबई पोलिसांची कर्तबगारी दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट सय्यद युनुस हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावर आधारित आहे. ज्याचे दिग्दर्शन अतुल सबरवाल हे करत आहेत.
शाहरुख खानच्या होम प्रॉडक्शन रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारा निर्मित हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. बॉबी देओलचा दमदार कमबॅक पाहण्यासाठी चाहत्यांना चित्रपटाची खूपच उत्सुकता लागली आहे. “क्लास ऑफ 83′ मध्ये बॉबी देओलशिवाय अनुप सोनी, विश्वजीत प्रधान, जॉय सेनगुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.