रेस-3, हाउसफुल-4, द क्लास ऑफ 83 आणि आश्रम यासारख्या चित्रपट आणि वेबसीरिजने बॉबी देओलची पुन्हा नव्याने ओळख निर्माण करून दिली आहे. काही वर्षांपूर्वी बॉबीला काम मिळत नसल्याने तो चित्रपटसृष्टीपासून दुरावला होता. बेरोजगार असल्याने घरीच असलेल्या बॉबी नैराश्यात गेला. यामुळे त्याचे कुटुंबीयदेखील चिंतित होते.
दरम्यान, बॉबीने पुन्हा एकदा काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने जिममध्ये जात आपली शरीरयष्टी तयार केली. तसेच मित्र आणि चित्रपट निर्मात्यांना भेटला. यानंतर सलमान खानने पुढाकार घेतल्याने बॉबीने काम करण्यास सुरवात केली. रेस 3 आणि हाऊसफुल 4 सारख्या चित्रपटात बॉबीची भूमिका मोठी नव्हती, पण ती चाहत्यांना आवडली होती.
दुसरीकडे, त्याने आपले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवले. यामुळे चित्रपट निर्मात्यांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली. सध्या चित्रपटगृह बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. या प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने बॉबीबरोबर द क्लास ऑफ 83 हा चित्रपट बनविला होता. या चित्रपटात काही नवीन नव्हते, पण यातील बॉबीची भूमिकेला खूपच प्रसिद्धी मिळाली.सध्या बॉबीची डिमांड खूपच वाढली आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने अनेक स्क्रिप्ट वाचल्या असून तो पुन्हा काम सुरू करण्यास उत्सुक आहे.