शाहरुख खानच्या रेल चिलीज इंटरटेन्मेंट आणि दृश्यम फिल्म्सने “लव्ह हॉस्टेल’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमन हे करणार आहेत. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा आणि विक्रांत मैसी झळकणार आहेत.
हा चित्रपट देहाती उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर आधरित आहे. “लव्ह हॉस्टेल’ एका उत्साहित तरुण जोडप्याची कथा असून यात काही जण त्यांच्या मागावर असतात. यात विनाश आणि रक्तपात याच्यासह सत्ता, धन आणि तत्त्वे याची सांगड घालण्यात आली आहे.
एक मनोरंजक, थ्रिलर असलेल्या “लव होस्टल’बाबत दिग्दर्शक शंकर रमन म्हणाले, मला नेहमीच मन आणि मनाच्या प्रश्नांमध्ये रस होता. मी म्हणेन की, कोणताही प्रश्न असो, हिंसाचाराला कोणतेही उत्तर नाही. या चित्रपटात विक्रांत, सान्या आणि बॉबी देओलसह काम करणार असल्याने मला आनंद आहे. “लव्ह हॉस्टेल’च्या माध्यमातून आपला समाजाबद्दल काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण निवडलेला मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.
दरम्यान, “लव्ह हॉस्टल’ची निर्मिती गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच पूर्ण करत तो पुढील वर्षी रिलीज करण्यात येणार आहे.