बोट बुडाल्याने 58 शरणार्थ्यांना जलसमाधी

नौवाधिबो (मौरिटानिया)- उत्तर पश्‍चिम आफ्रिकेतील मौरिटानिया या देशाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये 58 शरणार्थ्यांना जलसमाधी मिळाली आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या शरणार्थ्यांशी संबंधित एजन्सीने ही माहिती दिली आहे. बुडलेल्या बोटीतील 83 जण पोहून किनारपट्टीवर पोहोचले आहेत. त्यांना मौरिटानियाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्यही केले आहे, असे “इंटरनॅशन ऑर्गनायजेशन फॉर मायग्रेंटस’ आणि “युनायटेड नेशन्स ह्युमन कौन्सिल फॉर रेफ्युजीज’ने म्हटले आहे.

जेंव्हा ही बोट मौरिटानियाच्या जवळ पोहोचली तेंव्हा बोटीत पुरेसे इंधन नसल्याचे लक्षात आले होते. या बोटी महिला आणि मुलांसह किमान 150 जण होते. गांबिया येथून 27 नोव्हेंबरला ही बोट निघाली होती.

बोट बुडाल्याचे समजताच मौरिटानियाच्या अधिकाऱ्यांनी वेगाने हालचाली करून शरणार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वाचवलेल्या शरणार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या शरणर्थ्यांविषयीच्या एजन्सीनेही शरणार्थ्यांच्या मदतीसाठी वैद्यकीय मदत पाठवली आहे. मौरिटनियच्या अधिकाऱ्यांकडून गांबियाच्या दूतावासाबरोबर समन्वय साधला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.