शिर्डी : साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आले आहे. अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. आमदार आशुतोष अशोकराव काळे (अध्यक्ष), अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत (उपाध्यक्ष), अनुराधा गोविंदराव अदिक (सदस्य), अॅड. सुहास जनार्दन अहेर(सदस्य), अविनाश अप्पासाहेब धनवटे (सदस्य), सचिन रंगराव गुजर (सदस्य), राहुल कनाल (सदस्य), सुरेश गोरक्षनाथ वाबळे (सदस्य), जयंतराव पुंडलिकराव जाधव (सदस्य), महेंद्र गणपतराव शेळके (सदस्य), एकनाथ भागचंद गोंदकर (सदस्य) यांची निवड करण्यात आली आहे.