तंत्रशिक्षण मंडळाकडून “हेल्पलाइन’

अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेसंबंधी शंकांचे होणार निरसन

पुणे – राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा 6 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत होत आहे. यासंबंधी काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावरून शंकेचे निरसन करावे, असे आवाहन तंत्रशिक्षण मंडळाने केले.

तंत्रशिक्षणच्या अंतिम वर्षाची परीक्षा “एमसीक्‍यू’ पद्धतीने होणार आहे. विद्यार्थी स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप आदीचा वापर करून सद्य:स्थितीत ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत तेथून परीक्षा देणार आहेत. त्यासाठी नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर युजर नेम, पासवर्ड तसेच लिंक एसएमएसद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार “मॉक टेस्ट’सुद्धा सुरू आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक अडचणी आल्यास आपल्या संस्थेतील विभागीय समन्वयकांशी संपर्क साधावा. तसेच त्यांच्यास्तरावर विद्यार्थ्यांची तांत्रिक अडचणी दूर न झाल्यास मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक “एमएसबीटीई’च्या संकेतस्थळावर देण्यात आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी संपर्क साधून अडचणी दूर करून घ्यावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव व्ही. आर. जाधव यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.