पंचिग पासला संचालक मंडळाची मान्यता

पुणे – काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलेला पंचिंग पास पुन्हा सुरू होणार आहे. पावसामुळे प्रवाशांना 24 दिवसांच्या भाड्यांत 30 दिवस प्रवास करता येतो. यातील वरील सहा दिवसांच्या तफावतीचे भाडे दोन्ही पालिकांनी पीएमपीला देण्याचे मान्य केले असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पंचिंग पास बंद केला होता. मात्र, मुंढे यांच्या बदलीनंतर विविध प्रवासी संघटनांनी सातत्याने आवाज उठवल्याने पुन्हा पास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार गेल्या काही दिवासांपूर्वी झालेल्या बैठकीतच तो सुरू करण्याचे ठरले होते. मात्र, अंमलबजावणी होत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही पालिकांशी पत्रव्यवहार करून पंचिंग पास सुरू करण्याला मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार पंचिंग पासच्या वरील मोफत सहा दिवसांच्या तफावतीचे भाडे दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला देण्यात येणार आहे. पीएमपीकडूनच अशी मागणी करण्यात आली आहे. यानुसार दोन्ही पालिकांनी पहिले तीन महिने सहाही दिवसांचे पैसे देणार असून यानंतर पंचिंग पाससाठी मी कार्ड बंधनकारक करण्यात येईल. यानंतर मात्र मी कार्डवरून कोणता प्रवासी किती दिवस प्रवास करतो हे समजणार असून यावरून वरील भाडे देण्याचे ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)