#Photo_Gallery : आभाळ फाटलं…!

पाटण  – कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातून 1 लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कोयना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने नदीला महापूर आला आहे. या महापूरात पाटण शहर जलमय झाले आहे. नविन एस. टी. स्टॅंड, झेंडा चौक, जुना स्टॅंड परिसर व कळकेचाळीला पुराने वेढा दिल्याने 22 कुटूंबे सुरक्षित स्थळी हालविण्यात आली आहेत. कराड-चिपळूण रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

पाटण तालुक्‍यासह कोयना पाणलोट क्षेत्रात बेसुमार पाऊस पडत आहे. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत असून व्यवस्थापनापुढे कोयना धरणातून विसर्ग करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र विसर्गामुळे कोयना नदीने रौद्ररूप धारण केले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीला आलेल्या पुरात पाटण शहारातील नविन एस. टी. स्टॅंड परिसर, कळकेचाळ, झेंडा चौकातील काही भाग महापुराने व्यापला आहे. तर केरा नदीचे पाणी पाटणच्या बाजार समिती शेजारील वस्तीत घुसल्याने याठिकाणी असणारी वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

रात्रीपासून मुसळधार पडणारा पाऊस तर कोयना धरणातून करण्यात येणारा विसर्ग यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीकाठावर असणाऱ्या कळकेचाळ व नविन एस. टी. स्टॅंड परिसर तसेच जुना स्टॅंड परिसरात असणाऱ्या नागरी वस्तीत पाणी हळूहळू शिरण्यास सुरवात झाली. या सर्व वस्तीतील नागरिकांना रविवारी प्र्रशासनाने नोटीस देऊन सुरक्षित स्थळी हालवण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र पुरजन्य परिस्थितीचे गांभीर्य रहिवाशांना नसल्याने सोमवारी सकाळपर्यत या वस्तीतील काही लोक घरात आडकून पडले होते.

मात्र पुन्हा सोमवारी सकाळी कोयना धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतल्याने पुराचा धोका पुन्हा वाढू लागला.पोलीसांच्या मदतीने काही अडकलेल्या नागरिकांना पुरातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी हालविण्यात प्रशासनास यश आले आहे. या सर्व वस्तीतील सुमारे 22 कुटूंबाना बाहेर काढून साळूंखे हायस्कूल याठिकाणी स्थलांतरीत केले आहे. कोयना धरणातून सातत्याने पाणी सोडावे लागत असून या पाण्यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपत्तकालीन परिस्थितीसाठी शासकिय यंत्रणाही सतर्क राहिलेली आहे.

 

कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाटण चौकातील भागाला पुर परिस्थितीचे स्वरूप आले आहे. मात्र पाटण शहरातील पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. कळकेचाळ, नविन एसटी स्टॅंड वजुना स्टॅंडचा काही भाग पाण्याखाली आहे. मात्र पुर परिस्थिती बिकट निर्माण झाल्यास एनडीआरएफला पाचारण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. जीव धोक्‍यात घालून कोणीही घरात थांबू नये. शासनाच्यावतीने जी काय मदत लागेल, ती देण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

शंभूराज देसाई , आमदार

पाटण शहारातील कळकेचाळ, नवीन स्टॅंड, जुना स्टॅंड परिसराची पाहणी सोमवारी दुपारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केली. पुर परिस्थितीत जीव धोक्‍यात न घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हालवून त्यांना आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष संजय चव्हाण, नगरसेवक उपस्थित होते.

विक्रमसिंह पाटणकर , माजी मंत्री

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)