यवत (वार्ताहर) – यवत (ता.दौंड)येथील यवत -खुटबाव रस्त्यावर असणाऱ्या साळोबावस्ती येथे कार चालकाने पायी चालणाऱ्या दोन इसमाना धडक देत चिरडून दोघांना दुरपर्यंत फरफटत नेल्याची घटना शुक्रवार (दि.०६) रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मी.घडली, यामध्ये दोनही इसमांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला.
याबद्दल आकाश ज्ञानदेव खंकाळ.(वय ३५ वर्ष,व्यवसाय खासगी नोकरी, रा.खुंटबाव ता.दौंड,जि.पुणे) यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आकाश अनिल जगताप याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
अधिकची माहिती अशी की, कारचालक आकाश अनिल जगताप (रा.खुटबाव,ता.दौंड) हे दारूच्या नशेत खुटबाव बाजूकडून यवतच्या दिशेने कार क्र.(एम. एच.१२ यु.यु.२९९९ ) हे भरधाव वेगाने चालवीत असताना ज्ञानदेव लाला खंकाळ(वय ६४ वर्ष रा.साळोबावस्ती खुटबाव, ता.दौंड,जि.पुणे) आणि ज्ञानदेव गुलाब शेळके(वय ४० वर्ष,रा. साळोबावस्ती,खुटबाव ता.दौंड) यांना पाठीमागून येऊन जोराची धडक दिली, यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
यांना चिरडून त्याने काही अंतरावर तसेच फरफटत घेऊन गेला आणि पुढे जाऊन बाळू सखाराम शिंदे(रा. साळोबावस्ती ता.दौंड,जि.पुणे) यांना देखील धडक देऊन भरधाव वेगाने तसाच पुढे निघून गेला फिर्यादी आकाश खंकाळ यांच्या फिर्यादीवरून आकाश अनिल जगताप याच्यावर यवत पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवून दोघांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे करत आहेत.