मुंबई : महाविकास आघाडी सरकार सरकारमधील अंतर्गत कुरघोडींची आणखी एक घटना समोर आली होती. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. नितीन राऊत यांनी कोणाशीही चर्चा न करता परस्पर हा निर्णय घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढचं नाहीतर त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांची तक्रार केल्याचं समोर आलं होतं. परंतु, आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वांना अंधारात ठेवून वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील 16 सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. तर काँग्रेसचेही अनेक नेते नितीन राऊत यांच्यावर नाराज होते. अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.