नीरावागजमध्ये 353 जणांचे रक्‍तदान

13 गावांतील दात्यांचा रक्‍तदान शिबिरास प्रतिसाद

बारामती (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती तालुक्‍यातील नीरावागज येथे सागरदादा देवकाते युवाशक्‍तीच्या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 353 जणांचे रक्‍त संकलित करण्यात आले. लॉकडाउनच्या कालावधीतील हे तालुक्‍यातील सर्वात मोठे शिबिर ठरले आहे. यावेळी 13 गावांतील रक्‍तदात्यांनी शिबिरात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार युवा शक्‍तीने शिबिराचे आयोजन केले होते. बारामती शहरात रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर विविध सामाजिक संस्थांनी रक्‍तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित शिबिरात 353 बाटल्या रक्‍त संकलित झाले.

विक्रमी सहभागामुळे ब्लड बॅंकांमधील रक्‍ताचा तुटवडा भरून निघाला. युवाशक्तीतर्फे रक्तदात्यांना मास्क, सॅनिटायझर, पाण्याचे जार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. रक्‍तदात्यांना एक वृक्षाचे रोप देण्यात आले. आयोजक सागर देवकाते यांनी राबवलेल्या हा उपक्रम इतरांसाठी देखील आदर्शवत ठरला आहे. प्रशस्तीपत्रक देऊन सागर देवकाते यांचा सन्मान करण्यात आला. रेडप्लस ब्लड बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची मदत झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध उपाययोजना राबवण्यासाठी सागर दादा युवाशक्‍ती प्रयत्नशील असेल, असे मत सागर देवकाते यांनी यावेळी व्यक्‍त केले.

रुग्णांसाठी रक्‍ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवाशक्‍तीकडून मोलाची मदत झाली आहे. युवाशक्‍तीचा आदर्श इतरांनाही प्रेरणादायी आहे, असे मत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, संचालक योगेश जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्‍त केले. गुलाबराव देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. गणपतराव देवकाते यांनी आभार मानले. 

यावेळी बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक राजेंद्र ढवण, प्रताप आटोळे, बारामती अर्बन बॅंकेचे संचालक सुरेश देवकाते, किरण तावरे, गुलाबराव देवकाते, प्रकाश देवकाते, अविनाश देवकाते, सरपंच अनिता देवकाते, सोमनाथ भोसले, राजाभाऊ देवकाते, चंद्रराव देवकाते, संजय देवकाते, सुनील देवकाते, बापूराव देवकाते, ज्ञानदेव बुरुंगले, बाळासाहेब बंडगर, गोविंद देवकाते, बाळासाहेब देवकाते, विठ्ठल देवकाते, तात्यासो धायगुडे उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी रक्‍तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार निरावागज येथे रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले होते. 13 गावांतील दात्यांनी रक्‍तदान शिबिरात सहभाग नोंदवला. 353 बाटल्या रक्‍त संकलित झाले. सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. 

– सुनील देवकाते व गणपत देवकाते, नीरावागज. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.