महाळुंगे इंगळे- शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व शंभूराजे दैनिक पूजा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण दीडशे जणांनी रक्तदान केले. आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात शिबिरार्थीना सरपंच विद्या मोहिते व उपसरपंच गणेश दौंडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
करोनाग्रस्त व अपघात ग्रस्तांचे या रक्तामुळे प्राण वाचले जाणार असल्याचे खेड बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, ग्रामपंचायत सदस्या संगीता गायकवाड यांनी सांगितले.