वालचंदनगर गार्डन येथे 101 तरुणांचे रक्तदान

 वालचंदनगर (वार्ताहर) – सध्या करोनामुळे देशात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक बांधिलकी जपत वालचंदनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 101 तरुणांनी सहभाग घेतला. यावेळी सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत, मास्कचा वापर करीत व सॅनिटायझर वापरत आरोग्यविषयक कडक काळजी घेण्यात आली.

शिवयुग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदात्यांना राज भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पाण्याच्या जारचे किट देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी युवक अध्यक्ष सचिन सपकळ, महेश बोंद्रे, गजानन बोंद्रे, वैभव कदम, हनमंत केंगार, सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब अर्जुन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वालचंदनगर शहराध्यक्ष अमरसिंह निंबाळकर, सदस्य ज्ञानेश्वर मेटकरी, मुक्तार शेख, अल्ताफ शेख, पिंटू डोंबाळे, राहुल रणमोडे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.