जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणार वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन रोहित पवार यांनी केले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील राजुरी येथे तब्बल 101 जणांनी रक्तदान करून आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.
रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती. मात्र, सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसाला वायफळ खर्च न करता समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील राजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 101 जणांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्यांना हेल्मेटचे सुद्धा वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच गणेश कोल्हे, सागर कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिद्र कोल्हे, पोलीस पा मोरे सर, सचिन युवराज कोल्हे, काकासाहेब कोल्हे, जयराम काळदाते, सूरज काळदाते, अभिषेक राळेभात, मल्हारी काळदाते, महेश पुरी, प्रदीप लटपटे, अमोल कोल्हे, सचिन कोल्हे, स्वप्नील कोल्हे, कृष्णा कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी सदाफुले सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.